रेती कंत्राटदारानी काढला स्मशानभुमी परिसरातुनच मार्ग

स्मशानभुमीतील शेड ला आले, रेती वाहतुकदाराच्या कार्यालयाचे स्वरूप

मूल (प्रतिनिधी) : सध्या रेती विक्रीमध्ये मोठया प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली असुन कंत्राटदार कोणत्याही स्तरावर जावुन घाटातुन रेती काडत आहे, मूल तालुक्यातील मौजा कोसंबी घाटावरून रेती काढण्यासाठी कंत्राटदारानी स्मशाभुमी परिसरातुनच रस्ता काढुन, स्मशाभुमीच्या शेडला कार्यालयाचे स्वरूप दिल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.

मूल तालुक्यातील कोसंबी ग्राम पंचायतने लाखो रूपये खर्च करून  स्मशानभूमी शेडची उभारणी केली आहे, त्यासोबतच काही अंतरापर्यंत संरक्षण भिंतही तयार केलेली आहे, सौंदर्यीकरणात भर पडावे यासाठी स्मशानभुमीच्या परिसरात विविध प्रजातीचे वृक्ष लावण्यात आलेले आहे, मात्र रेती घाटाच्या कंत्राटदारानी रेती वाहतुक करण्यासाठी चक्क स्मशाभुमी परिसरातुनच मार्ग काढलेला आहे, मार्ग काढण्यासाठी ग्राम ंपचायतने वृक्षरोपण केलेले अनेक वृक्ष तोडल्याची चर्चा आहे. यामुळे शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा रेती घाट कंत्राटदारांनी एैसीतैसी केल्याचे दिसून येत आहे.

पावसाळयात नागरीकांना स्मशाभुमीत जाण्यासाठी चिखलातुन मार्ग काढावे लागत होता, यामुळे ग्राम पंचायतच्या माध्यमातुन सिमेंट कॉक्रिट रस्त्याचेही काम याठिकाणी काही दिवसांपुर्वी करण्यात आले होते, या सिमेंट कॉक्रिट रस्त्यावरूनही मोठया प्रमाणावर रेती भरलेल्या व खाली टॅªक्टर ये-जा करीत असल्याने काही दिवसातच सिमेंट क्रॉक्रिट रस्त्याचे तीनतेरा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे रेती घाट कंत्राटदारांनी रेती नेण्यासाठी मार्ग बदलवावा अशी मागणी केली जात आहे.

‘‘बि वन’’ ची  टिम मूल मार्गावर
मूल तालुक्यातील बहुतांष रेती घाटांचा लिलाव झालेला असुन अनेक रेती घाट हे करोडो रूपयांच्या घरात गेलेले आहे, मात्र काही दिवसांपुर्वी सुरू झालेल्या एका रेती घाटावर ‘‘बि वन’’ च्या टिम नें आपला मोर्चा त्याकडे वळल्याने प्रशासनाला आता नजर ठेवुन राहणे आवश्यक झाले आहे, अन्यथा लाखो रूपयाचा महसुल बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तहसीलदार होळीची अवैध रेती तस्करांवर बारीक नजर
मागील काही महिण्यापासुन रेती घाटांचा लिलाव झालेला नव्हता, यामुळे खाजगी आणि सरकारी बांधकामे ठप्प झालेली होती मात्र प्रशासनाने तालुक्यातील बरेच रेती घाटांचा लिलाव करून कंत्राटदाराना रॉयल्टी सुपुर्द केलेली आहे, अशा स्थितीत काही रेती तस्कर बिना रॉयल्टी रेती वाहतुक करून शासनाचा महसुल बुडविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा रेती तस्कारांवर मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यानी बारीक नजर ठेवुन असल्याने अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.