एक एप्रिलपासून राज्यातील निर्बंध हटवणार

आरोग्यमंत्री राजेश टोपें यांचे महत्वाचे विधान

मुंबई (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे सरकारने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. ती एक एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बध हे हटवले जाणार आहे. तसेच मास्कचा वापर मात्र बंधनकारक असणार असल्याचे म्हत्वाचाही विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केले.

डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, “राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध मुक्ती होणार आहे. कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर आलेले निर्बंध देखील हटणार आहेत. या काळात मात्र, लोकांनी मास्कचा नियमित वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

परदेशामध्ये कोरोनाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे आगामी सणवार साजरे करताना काळजी घ्या. दुसऱ्या देशांमधील चौथ्या लाटेचा परिणाम आपण पाहतो आहोत. त्यामुळे मास्क मुक्तीचं धाडस शक्य नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरलाच गेला पाहिजे. तेच आपल्यासाठी हितकारक आहे. तुर्तास तरी संपूर्णपणे मास्क मुक्तीचा कसलाही विचार सरकारने केलेला नाहीये. त्यामुळे मास्क हा घातलाच पाहिजे.

चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त होत असताना भारतात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रात कोरोना निर्बंधातून मुक्तता मिळणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहे.