मूल-चामोर्शी मार्गावर भिषण अपघात

दुचाकी स्वार जागीच ठार, एक गंभीर जखमी

मूल (प्रतिनिधी) : चांदापूर वरून मूल ला दुचाकीने येत असलेल्या वाहनाला टाटा पिकअप चारचाकी वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मूल-चामोर्शी मार्गावरील उमउमा नंदीजवळ सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. विनोद नागापूरे असे मृतकाचे तर अविनाश गेडाम गंभीर जखमी युवकाचे नांव आहे.

मूल तालुक्यतील चांदापूर येथ्ज्ञील विनोद नागापूरे वय 25 वर्षे आणि अविनाश गेडाम हे दाघे युवक दुचाकीने मूल येथे येत होते, तर मूल वरून चामोर्शी कडे जाणाऱ्या पिकअप चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीने जाणारा विनोद नागापूरे हे जागीच ठार झाले तर अविनाश गेडाम हे गंभीर जखमी झाला. सदर घटनेमुळे चांदापूर येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे. गंभीर जखमी असलेल्या अविनाश गेडाम यांच्यावर उपचार करण्यासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले आहे.

मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला, पुढीत तपास मूल पोलीस करीत आहे.