नगर पालीका प्रशासनाचे दुर्लक्ष
मूल (प्रतिनिधी) : मूल नगर पालीका क्षेत्रातील व पंचायत समितीच्या अधिनस्त असलेल्या गांधी चौकातील एका जागेवर बेकायदेशीर बांधकाम करण्यात येत असुन सदर बांधकाम तात्काळ थांबवुन संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मूलच्या नगरसेविका प्राची आनंद आक्केवार यांनी मूल नगर पालीकेच्या अध्यक्षा, मुख्याधिकारी आणि बांधकाम सभापती यांचेकडे केली आहे. Illegal construction on government land
मूल शहरातील गांधी चौकातील पंचायत समितीचे मोक्याचे जागेवर अज्ञात व्यक्तींकडुन बेकायदेशीर पक्के बांधकाम, सिमेंट कॉंक्रिटचे कॉलमचे बांधकाम सुरू केलेले आहे. पंचायत समितीच्या मालकीच्या गाळयावर अनधिकृत बांधकामाबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत मुख्याधिकारी यांचेकडे यापुर्वी पंचायत समितीने लेखी पत्र दिलेले आहे. एका शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम होत असतांना मूल पंचायत समितीनेे नगर पालीकेला माहिती देवुनही नगर पालीका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नगरसेविका आक्केवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. Prachi Akkewar
मूल शहरातील गांधी चौकस्थित असलेल्या शासकीय जागेवर बांधकाम करून, शासकीय मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याने, सदर बांधकाम तातडीने थांबवुन शासकीय मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाÚयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मूल नगर पालीकेच्या नगरसेविका प्राची आक्केवार यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी, मूलचे संवर्ग विकास अधिकारी, नगर पालीकेचे अध्यक्षा, बांधकाम सभापती आणि मुख्याधिकारी यांचेकडे केलेली आहे. Municipal Council









