“ते” लैलामजनु कोण ? युवकांनी दिला चोप

विवस्त्र अवस्थेत सापडल्याच्या चर्चेला उधाण

मूल (प्रतिनिधी) : येथील एका युवा रंगेल व्यवसायीकांची मूल येथीलच एका विधवा महिलेशी सुत जुळले, अनेक दिवसांपासुन कधी पहाटे तर कधी भर दिवसाच भेटुन गप्पा मारित असत, मात्र दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील करवण परिसरात भर दुपारी सदर लैला-मजनुनी विवस्त्र असल्याचे काही युवकांना आढळुन आले, दरम्यान काही युवकांनी त्यांना पकडुन चांगलाच चोप दिल्याची चर्चा मूल शहरात सुरू असल्याने तो रंगेल स्वभावाचा व्यवसायीक कोण? असा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.

मूल येथील अनेक व्यवसायात पार्टनर असलेल्या एका रंगेल स्वभावाचा युवक आपल्या मुलीला शाळेत पोहचवुन देत असतानाच, त्याचा एका विधवा महिलेशी संपर्क आला, रोज रोज दिसत असल्याने ते एकमेकांच्या प्रेमात आंकात बुडाले, यातुन ते कधी मूल येथील कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणावर पहाटेच फिरायला जात होते, अनेकानी त्याना वेगवेगळया अवस्थेत बघीतले मात्र करोडपती लैलामजनुला बोलण्याची हिम्मत कोणी करीत नव्हते, आता या प्रेमी युगलांनी करवणच्या दिशेकडे जावुन नको त्या अवस्थेत असतांनाच काही युवक त्याठिकाणी येवुन त्यांना चांगलाच चोप दिला, यावेळी घाबरलेल्या अवस्थेतील लैलामजन वेळ न घालविता मूलच्या दिशेनेने निघाले. मात्र सुखरूप जाण्यासाठी त्यांच्याकडुन मोठी रक्कम घेतल्याची चर्चा आहे.

चंद्रपूर आणि नागपूर येथीलही अनेक महिला सदर रंगेल स्वभावाच्या व्यवसायीकाच्या संपर्कात नेहमीच राहात असल्याची चर्चा आहे.