शासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा:सौ दीक्षा पाटील सरपंच


सिमेंट लोहा रेती च्या किमती गगनाला भिडल्याने वाढीव निधीची आवश्यकता

प्रमोद मेश्राम चिमूर:-शासनाने गोर गरीब जनतेला व समाजातील दुर्बल घटकांना राहण्यासाठी पक्के घरे बांधून देण्यासाठी रमाई, शबरी आणि पंतप्रधान आवास घरकुल योजना राबवित आहे यासाठी ठराविक निधीची तरतूद केली आहे परंतु महागाई चा आगडोंब उसळल्याने सिमेंट लोहा रेती ची किमती गगनाला भिडल्या मुळे घरकुल योजनेतील घर बांधणे अवघड झाले आहे तेव्हा शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सौ दीक्षा पाटील सरपंच लोहारा यांनी केली आहे

शासन हे घरकुल योजना राबवित असून घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत आहे परंतु या निधी मध्ये आता घर बांधणे अशक्य आहे कारण घर बांधायला लागणारे सर्व साहित्य हे महाग झाले असून त्यांच्या किंमती वाढून गगनाला टेकले आहे आज लोहा हा आठ हजार रुपये ककीटल झाले असून सिमेंट बॅग चारशे रुपये झाली आहे तर रेतीला सोन्याचे भाव आले असून रेती उपलब्ध होत नाही त्यामुळेअवैध रेती अवाजवी भावाने घ्यावी लागते आणि महत्त्वाचे म्हणजे मागील एका महिन्यात या सर्व साहित्याच्या किमती वाढल्यामुळे शासनाने दिलेल्या निधीत घर बांधणे कठीण होत असून घर पूर्ण होऊ शकत नाही

घरकुल योजनेचा लाभ भेटलेल्या यावर्षीच्या लाभार्थ्यांना उपलब्ध निधीत घर बांधणे फार कठीण होत असून सर्व साहित्य महागल्यामुळे गोर गरीब लाभार्थी हे घरकाम पूर्ण करू शकत नाही घर बांधावे की कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे तेव्हा शासनाने या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून व विचार करून घरकुल लाभार्थ्यांना वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी सौ दीक्षा शैलेंद्र पाटील सरपंच लोहारा यांनी केली आहे