अनोळखी युवतीचे मुंडकं नसलेले निवस्त्र शव आढळले : भद्रावती शहर हादरले

गवराळा शेत शिवारातील घटना
घटनेची विविध चर्चा

अतुल कोल्हे भद्रावती –
शहरातील गवराळा परिसरातील शेतशिवारात निवस्त्र 25 वर्षीय युवतीचे मुडकं नसलेले धड आढळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.

गवराळा शेतशिवारात बीसेन ढेंगळे यांचे शेत आहे. त्यांच्या बाजूला झाडे यांचे शेत आहे. अमोल झाडे हे पहाटे शेतीच्या कामासाठी गेले असता त्यांना ढेंगळे यांच्या शेतात निवस्त्र अवस्थेत युवतीचा मुडकं नसलेला मृतदेह दिसला त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असता. युवतीचे मुडकं नसलेले धड निवस्त्र अवस्थेत पडले होते. त्याच्या बाजूला मोबाईल चार्जर, हेडफोन, चाबी, युतीची जूती व चिल्लर पैसे असे आढळून आले. परंतू युवतीचे मुडकं आढळून आले नाही या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा तर्कवितर्क काढण्यात येत आहे.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी, ठाणेदार गोपाल भारती, फॉरेन्सिक टीम, फिंगर टिम, एक्सपर्ट पथक दाखल झाले असून वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहे परिसरातील ठाण्यात कोणतीही युवतीची मिसिंग आहे का! याबाबत तपास करीत आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.