आगीत घर जळून खाक

धनराज रामटेके मुल:- तालुक्यातील जूनासूर्ला येथे आज सकाळी 7.30 च्या सुमारास घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली.

 

मल्ला नागो देऊलवार वय -87 वर्षे व मीराबाई मल्ला देऊलवार वय अंदाजे -76 वर्षे हे दोघेच घरी होते. मीराबाई सकाळी स्वयपांक करण्याकरिता घरामध्ये चूल पेटविल्याने अचानक आगीचा भडका होऊन घराला आग लागली त्यामध्ये मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन संपूर्ण आग आटोक्यात आणली.