आजपासून वडसी येथे बौद्ध धम्म मेळाव्याचे आयोजन

दि ९ एप्रिलला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजरत्न आंबेडकर यांची उपस्थिती

प्रमोद मेश्राम चिमूर:- तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथे दि ८-९-व १० एप्रिल २२ ला धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेया तिन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये दि.८ ला सा.६ वा.मिरवणूक सा.८ ते १० भिम बुद्ध गितांचा कार्यक्रम अशोक चक्र गायन पार्टि वडसी, दि.९ ला स.१० ते १२ वा बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना भिक्कु संघ संघारामगिरी यांचे हस्ते दु.१ ते ३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. टेंभुरकर तळोधी,प्रमुख मार्गदर्शन म्हणून राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा,ज्ञानेश्वर रक्षक सामाजिक कार्यकर्ते नागपूर ,प्रमुख पाहुणे म्हणून कैलास ठेंगळे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर,सुधाकर चौखे गुरुजी वरोरा,संध्याताई राजुरकर निवासी संपादक दै बहुजन,अर्चना ताई रंगारी वरोरा, डॉ. सतिशभाऊ वारजुकर माजी अध्यक्ष जि.प.चंद्रपूर,अँड.भुपेश पाटील सामाजिक कार्यकर्ते नागपूर, अन्नपूर्णा नांदाडे सरपंच ग्रामपंचायत वडसी,सत्कार मुर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दान देणारे राजेंद्र शंकरराव मेश्राम नागपूर,बुद्ध मुर्ती दान देणारे सौ छायाताई दिगांबर मेश्राम नागपूर,यांचा सत्कार होणार आहे रात्री ८ ते १० सांस्क्रुतिक कार्यक्रम होत असुन एकपात्री अभिनय महेंद्र गोंडाने भाकर सहभाग महिला मंडळ वडसी सहभाग मुले मुली यांचे असणार आहे.

दि १० एप्रिल ला समारोपीय कार्यक्रम होणार आहे अध्यक्ष स्थानी भानुदासजी पोपटे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते नेरी हे असणार आहेत ,अतिथी मध्ये ज्ञानेश्वर नागदेवते, धनराज मुंगले,गोपीचंद गजभे,अमित गजभिये,सुरेश डांगे,दामोधर गेडाम,मोरेश्वर गायकवाड पो.पा.सायंकाळी ५ वाजता भोजन दानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील जनतेनी बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे अशोक चक्र बौद्ध विहार कमेटी ,रमाबाई महिला मंडळ,भोई समाज मंडळ वडसी,गुरुदेव सेवा मंडळ वडसी तथा समस्त ग्रामवासियांतर्फे नितीन पाटील सचिव बौद्ध पंचकमेटी, धनराज मेश्राम,जनार्धन गजभिये,विजय खोब्रागडे यांनी एका पत्रकातुन आवाहन केले आहे.