नेरी येथे भव्य मोफत रोगनिदान होमिओपॅथीक औषधोपचार शिबिर

शिबीराचे लाभ घेण्याचे नॅशनल अकॅडमी आफ होमिओपॅथी यांचे आवाहन

प्रमोद मेश्राम चिमूर:- नेरी येथे नॅशनल अकॅडमी आफ होमिओपॅथी ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर तसेच जे एन एस हेल्थ केअर नागपूर व जे वि एस फार्मा कंपनी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान ,होमिओपॅथीक औषधोउपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन 10 एप्रिल ला सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत ग्रामपंचायत भवन समोर श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे आयोजित केला आहे तरी हजारोंच्या संख्येने रुग्णांनी या शिबिराचे लाभ घ्यावें असे आवाहन आयोजकांनी केला आहे

नेरी येथे होमिओपॅथीक शास्त्राचे जनक डाँ सॅम्युअल हँनिमन यांच्या 267 व्या जयंतीनिमित्त भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला दिल्ली नागपूर सहीत विदर्भातील तज्ञ डाँकटरांची उपस्थिती राहणार असून रुग्णांना औषधोपचार व मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा अमूल्य संधीचा फायदा जास्तीतजास्त रुग्णांनी घ्यावा असे आयोजकानी आवाहन केले आहे

तसेच अनेक रोगांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून जो रोग आयुर्वेदिक व इतर प्रकारच्या औषध उपचारा ने बरा झाला नसेल अश्या रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेऊन मोफत होमिओपॅथी औषध उपचार करावा तसेच जुन्यात जुन्या रोगावर रामबाण इलाज म्हणून जगामध्ये होमिओपॅथी औषध प्रसिद्धीस आली आहे तेव्हा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन रुग्णांनीआपल्या जीवनाचा फायदा करून घ्यावा असे आवाहन चिमूर तालुका संयोजन युनिट ने केले आहे