वर्षा रामटेके ठरल्या पुन्हा “स्ट्रॉंग वुमन् ऑफ इंडिया”

तिसऱ्यांदा विजेतेपद

चंद़पूर (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पधॉ जिंकून येथील पॉवर लिफ्टर सौ.वषॉ रामटेके यांनी तिसऱ्यांदा स्ट्रॉंग वुमन् ऑफ इंडिया हा खिताब जिंकुन जिल्ह्याला बहूमान मिळवून दिला आहे.

7, 8, 9 एप़िल रोजी अग्रसेन् भवन नागपूर येथे आयोजीत राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पधैत अतुलनीय
कसब दाखवून वर्षा रामटेके तिसऱ्यांदा स्ट्रॉंग वुमन्
ऑफ इंडिया ठरल्या आहेत. सदर स्पर्धा पावर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आली
होती.

वर्षा रामटेके यांनी या पुर्वी सोनिपत् (हरियाणा) व रायपूर येथे दोनदा हा अत्यन्त मानाचा खिताब जिंकला आहे.गत महिन्यात चंद्रपूर येथील स्पर्धेत स्ट्रॉंग वुमन् ऑफ चंद्रपूर
हा खिताब् जिंकला होता हे विशेष.

चंद्रपूर येथील शासकिय् वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. बंडू रामटेके यांच्या वर्षा रामटेके अर्धांगिनी आहेत. वर्षा रामटेके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.