राजोलीतील अवैध दारूविक्रीला राजकीय राजाश्रय?

‘‘मल्लेश’’ आणि ‘‘गेडाम’’ करतात अवैध दारूविक्री  : गावकरी त्रस्त  : बंद करण्याची मागणी

मूल (प्रतिनिधी) : जिल्हयात अवैध दारूविक्री करण्यास बंदी असतानाही मूल तालुकयातील राजोली येथे मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री सुरू आहे, राजोलीतील ‘‘मल्लेश’’ याची देशी तर ‘‘गेडाम’’ यांची मोहफुलांची दारू राजोलीमध्ये राजरोषपणे सुरू आहे, यामुळे सदर दारूविक्रेत्याला राजकीय राजाश्रम तर मिळत नाही नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी असतानाही मोठया प्रमाणात अवैध दारूविक्री सुरूच होती, यामुळे महाविकास आघाडी सरकारने जिल्हयातील दारूबंदी हटवुन सरकारमान्य दारूविक्री सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे, यामुळे जिल्हयात सुरू असलेली अवैध दारूविक्री काही प्रमाणात बंद झालेली आहे. मात्र मूल तालुक्यातील राजोली येथील ‘‘मल्लेश’’ नामक व्यक्तीकडुन मोठया प्रमाणात अवेध दारूविक्री सुरूच आहे, देशी आणि मोहफुलांची दारू याठिकाणी विक्री केली जात असल्यामुळे शाळकरी मुलेही यादारूच्या आहारी जात असल्याची चर्चा आहे,

‘राजोलीत अवैध दारूविक्रीमुळे नागरीक हैरान’ या मथळयाखाली दे धक्का एक्सप्रेस मध्ये काही दिवसांपुर्वी वृत्त प्रकाशित करताच, मल्लेशनी काही दिवस अवैध दारूविक्री बंद केलेली होती, मात्र आता परत ‘‘मल्लेश’’ आणि ‘‘गेडाम’’ यांनी आपले रंग दाखवित अवैध दारूविक्री करीत आहे, पोलीस प्रशासन आणि स्थानिक पोलीस पाटील याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा सवालही येथील महिला करीत आहे.. अवैध दारूविकीमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे राजोलीत सुरू असलेली ‘‘मल्लेश’’ ची देशी आणि ‘‘गेडाम’’ची मोहफुलांची अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी नागरीक करीत आहे.