विसापूर (प्रतिनिधी) : भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर प्रखर राष्ट्रभक्त होते. राष्ट्रहिताला बाधा पोहचेल असे कोणतेही कार्य त्यांनी केले नाही. त्यांनी देशाला बहाल केलेले भारतीय संविधान याची साक्ष देत आहे. मात्र समाज व्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी. हा त्यांचा आग्रह होता. कमकुवत घटकाला समानतेची वागणूक मिळावी. त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे. त्यांनी कायमस्वरूपी विषमता नष्ट करण्यासाठी संघर्ष केला. भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेचा फेरा तोडण्यासाठी तथागत बुद्धाच्या धम्म दिक्षेचा मार्ग दिला, असे प्रतिपादन विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत तर्फे स्थानिक मुनी समाज भवन, ग्रामपंचायत जवळ सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, ग्रामपंचायत सदस्य सुनील रोंगे, दिलदार जयकर, गजानन पाटणकर, विद्या देवाळकर, सुरेखा इटणकर, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, शशिकला जिवने, लिपिक संतोष निपुंगे, राहुल टोंगे, अशोक ठुणेकर, रमा मुंजेकर यांची उपस्थिती होती.
दरम्यान भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी शशिकला जिवने व विद्या देवाळकर यांनी संविधानाचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन संतोष निपुंगे यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी मानले.