वृक्षारोपन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

शोध विचार वेध संस्थेचा पुढाकार

मूल (प्रतिनिधी) : शोध विचार वेध संस्था व नगर परिषद मूलच्या वतिने भारतरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती नगर पालीकेच्या नविन शाळेच्या पटांगणावर 14 वृक्षांचे रोपन करून साजरी करण्यात आली.

यावेळी मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, माजी सभापती मिलिंद खोब्रागडे, माजी नगरसेवक विनोद कामडी, शोध विचार संस्थेचे अध्यक्ष व पर्यावरण दुत गौरव शामकुळे, माझी वसुंधरा अभियानचे ब्रँड अम्बेसेडर राहुल आगडे, नगर परिषद पाणी पुरवठा अभियंता श्रीकांत समर्थ, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणाला पुरक वृक्षारोपण हि काळाची गरज असून, वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन व जतन करण्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी केला. यावेळी मूल नगर पालीकेचे कर्मचारी, स्वच्छ्ता मित्रा व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.