गुरूकडुनच विद्यार्थींनी असलेल्या शिष्यांवर अत्याचार

वर्षेभरापासुन सुरू होता सदर प्रकार

जिवती (प्रतिनिधी) : अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना जिवती तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड वय 49 याला जिवती पोलिसांनी अटक केली आहे.

जिवती तालुक्यातील एका गावात पहिली ते पाचवी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत आरोपी नराधम शिक्षक अल्पवयीन मुलींना कार्यालयात आळीपाळीने बोलवायचा. त्यानंतर अश्लिल चाळे करुन अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु असून एका मुलीने आईला ही घटना सांगितल्यानंतर आरोपी शिक्षकाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

आरोपी शिक्षकाने सहा ते सात विद्यार्थिनींसोबत असा घृणास्पद प्रकार केला असून, मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहे.