अध्यक्ष अविरोध मात्र उपाध्यक्षपदासाठी निवडणुक

कॉग्रेसच्या एकतर्फी राजकारणाला धक्का

मूल (प्रतिनिधी) : सहकारी क्षेत्रातील अतिशय महत्वाची मानल्या जाणाÚया विविध कार्यकरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणुक शुक्रवारी संस्थेच्या कार्यालयात पार पडली, अध्यक्षपदी संदिप कारमवार यांची अविरोध निवड झाली तरी उपाध्यक्षपदी अरविंद बोरूले आणि भोजराज गोवर्धन यांची नावे पुढे आल्याने यात झालेल्या निवडीमध्ये अरविंद बोरूले निवडुन आले, कॉंग्रेसचा गड असलेल्या मूल येथील विविध कार्यकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमुळे कॉंग्रेसच्या एकतर्फी राजकारणाला भविष्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मूल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुक नुकतीच अविरोध पार पडली. 13 सदस्य संख्या असलेल्या या संस्थेवर आधी पासुनच कॉंग्रेसचे वर्चस्व होते, यासंस्थेत कधीही निवडणुक झालेली नाही, प्रत्येकच वेळी अविरोध निवडुण येण्याची परंपरा यासंस्थेमध्ये पध्दशीरपणे पार पाडल्या जात आहे, मात्र शुक्रवारी दुपारी 2 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी आर. डी. कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष अािण उपाध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली, यावेळी संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष संदिप कारमवार यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अरविंद बोरूले आणि भोजराज गोवर्धन यांचे नांव पुढे आल्याने, श्री. गोवर्धन यांनी गुप्त मतदान पध्दतीने निवडणुक घेण्याची मागणी केली, मात्र निवडणुक निर्णय अधिकाÚयांनी हात वर करून निवडणुक घेतल्याने, झालेल्या निवडणुकीत अरविंद बोरूले यांना 10 ते भोजराज गोवर्धन यांना 3 मते पडली.

कॉंग्रेस पक्षाने आधिच अध्यक्ष, उपाध्यक्ष हे पद कोणाला दयायचे हे ठरवुन ठेवलेले असतानाही गोवर्धन यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने नेहमीच संस्थेची होणारी अविरोध निवडणुक यावर्षी मात्र उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने एकतर्फी राजकारणाला भविष्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.