वाढदिवसानिमीत्य पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडु आणि पावडे भेट

शोध विचार बहुउद्देशिय संस्थेकडे साहित्य सुपुर्द

मूल (प्रतिनिधी) : गेल्या वर्षीपासुन शोध विचार बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन सोमनाथ मदीर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, सदर अभियानाला झाडु आणि पावडयाची गरज असल्याने मूल येथील सामाजिक कार्यकर्ते व ओबीसी नेते राकेश ठाकरे यांनी मुलीच्या वाढदिवसाचे औच्छित्य साधुन झाडु आणि पावडे भेट देवुन पर्यावरणाच्या रक्षासाठी मदत केली आहे.

मूल येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे यांची मुलगी कुमारी रेवा हिचा प्रथम वाढदिवस शुक्रवारी 29 एप्रिल रोजी आहे. राकेश ठाकरे यांची जेष्ठ कन्या कुमारी रिषीता हिच्या वाढदिवसानिमीत्य दरवर्षी मुलींच्या वाढदिवसाचे निमीत्ताने चंद्रपूर येथील किलबील संस्थेला जिवनाश्यक वस्तु मुकबधीर शाळेत मुलींचा वाढदिवस साजरा करून मुलाना शालेय जिवनात उपयोगी येणारे पुस्तके, वही व पेन वाटप केले, तर जंगलव्याप्त परिसर असलेल्या डोणी येथील नागरीकांना कोरोना काळात वाफारा वाटप करून मुलीचा वाढदिवस आगडावेगळा उपक्रम राबवुन साजरा करीत आहे.

शोध विचार बहुउद्देशिय संस्थेच्या स्वच्छता अभियानासाठी साहित्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी केले होते, त्याआवाहनाला प्रतिसाद देत राकेश ठाकरे यांनी मुलीच्या वाढदिवसाचे औच्छित्य साधुन झाडु आणि पावडे दिल्याने त्यांचे शोध विचार बहुद्देशिय संस्थेच्या वतिने आभार मानले.