डोंगरगांव सेवा सहकारी सस्थेवर शेतकरी एकता आघाडीचा दणदणीत विजय

13 पैकी 12 उमेदवार विजय : प्रस्तापित गटाचा दारूण पराभव

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यताील डोंगरगांव येथील सेवा सहकारी सस्थेची निवडणुक शनिवारी पार पडली यानिवडणुकीत शेतकरी एकता आघाडीमधील 12 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला तर प्रस्तापित गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सदर निवडणुक डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम वासेकर यांच्या नेतृत्वात व डोंगरगांवच्या सरपंच शिल्पाताई भोयर यांच्या सहकार्याने लढविण्यात आली होती.

सन 2021-22 ते 2026-27 याकालावधीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी एकता आघाडीकडुन सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदार संघातुन किरण पोरेड्डीवार, मधुकर मुंगमोडे, सुभाष शेंडे, अली रमजान अली सय्यद अजगर, बंडु मांदाडे, रमेश ठिकले, सुनिता ठगे हे विजयी झाले. अनुसुचित जाती/जमाती राखीव मतदार संघातुन नामदेव खोब्रागडे, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागासप्रवर्ग गटातुन हरीदास चांभारे हे विजयी झाले आहेत.

सदर निवडणुकीत सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची मानली जाते, डोंगरगाव येथील सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव मतदार संघातुन धृपदाबाई मोहुर्ले आणि विमलवाई वासेकर हया अविरोध निवडुन आल्या, आणि इतर मागासवर्गीय मतदार गटातुन शंकर शेंडे आणि मंगेश ठिकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र ऐनवेळी शंकर शेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मंगेश ठिकरे हे अविरोध निवडुण आले.

सदर निवडणुकीत शेतकरी एकता आघाडीच्या विजयामुळे सहकार क्षेत्रातील प्रस्तापित गटाला मोठा हादरा बसला हे विशेष.