गोठ्याला आग लागल्याने लाखोचे नुकसान

अग्नीशम दलामुळे आग आटोक्यात

मुल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिखली येथील शेतकरी विरूजी कळस्कर यांचे गोट्याला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. अग्नीशमन दलाचे वाहन आल्याने आग आटोक्यता आली.

विरूजी कळस्कर यांच्या गोठयाला लागलेली आग विझविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने, मुल येथील नगर पालीकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि आग आटोक्यात आली. गावकÚयानी घटनास्थळाजवळ गर्दी केली होती. घटनास्थळावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याने कोणतेही अनुसुचित घटना घडली नाही. मात्र विरूजी कळस्कर यांचे मोठे नुकसान झाले आहे.