प्रगतीशिल शेतकरी दिनेश शेंडे वसतराव नाईक कृषीभुषण पुरस्काराने सन्मानित

महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते पुरस्कार प्रदान

✍️ नुतन गोवर्धन, मूल
महाराष्ट्र शासनाच्या वतिने दिला जाणारा वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार 2019 सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील प्रगतीशिल शेतकरी दिनेश नामदेव शेंडे यांना जाहिर झाला असुन सदर पुरस्कार राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते नाशिक येथील धन्वतरी सभागृहात सोमवारी 2 मे रोजी प्रदान करण्यात आला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ, राजयाचे कृषीमंत्री नामदार दादा भुसे, कृषी राज्यमंत्री नामदार विश्वजित कदम, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरजकुमार उपस्थित होते..

कोरोना संक्रमणामुळे संपुर्ण जगावर मोठे संकट उभे असतानाही शेतकÚयांनी शेतात विविध पिकाचे उत्पन्न घेवुन संपुर्ण जगाला वाचविण्याचे काम केले आहे. दरवर्षी वितरीत करण्यात येणारा पुरस्कार कोरोनामुळे वितरीत करता आले नाही, यामुळे सन 2017 ते 19 यावर्षात उत्कृष्ठ कार्य करणाÚया शेतकÚयांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हयातील सिंद्रेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील प्रगतीशिल शेतकरी दिनेश नामदेव शेंडे यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते पुरस्कार स्विकारला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी राज्यमंत्री विश्वजित कंदम यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यातील विविध भागातुन आलेले शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.