भिषण अपघातात पाच मजूरांना ट्रकने चिरडले, दोन ठार; तीन गंभीर

घुग्घुस (प्रतिनिधी) : घुग्घुस-वणी राज्य महामार्ग क्रमांक सात वरील पुनवट गावाजवळ चार वाजताचा सुमारास भिषण अपघात घडला. घुग्घूसपासून अवघ्या पाच कि.मी. अंतररावर घडलेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने IVRCL कंपनीचा चार मजूरांना चिरडले. महादेव बालवटकर (बेलोरा), राजू मिलमिले ( मारेगाव) असे मृतकांची नावे आहेत. सूरेश जूनघरी, सतीश गेडाम आणि परत एक मजूर गंभीररीत्या जखमी झालेत. जखमीना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना आज चार वाजताचा दरम्यान घडली.

प्राप्त माहीतीनुसार, घुग्घुस वणी मार्गावर आयव्हीआरसीएल ( IVRCL) या कंपनीचे मार्गाचा डागडुजीचे काम सुरू होते. घुग्घुस-वणी राज्य महामार्ग क्रमांक सात वरील पुनवट गावा जवळ कंपनीचे मजूर डागडुजी कार्यात व्यस्त होते. ट्रक्टर आणि पिकअपने माल वाहतूक करीत होते. अश्यात वणी येथून येणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 31 FC6399 ) पाच मजूरांना चिरडले. यात बेलोरा आणि मारेगाव येथिल मजूराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीररीत्या जखमी झाले.

अपघाताची माहीती मिळताच वणी तालुक्यातील सिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन तरवडे यांनी घटनास्थळ गाठले. जखमीना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील काही महीण्यात या मार्गावर लहान-मोठ्या अपघाताचा अनेक घटना घडल्या आहेत हे विशेष.