माजी नायब तहसिलदार भगवान वाढई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अभिष्टीचिंतन सोहळा संपन्न

मूल (प्रतिनिधी) : माजी नायब तहसिलदार भगवानजी नागोजी वाढई यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्त 5 मे रोजी अभिष्टीचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता .सदर सोहळानिमित्याने गावात 75 वृक्षाचे रोपन यावेळी मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुण चंद्रपूरच्या प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे,  डॉ. राकेश गावतुरे,  श्रीमती शशिकला गावतुरे , विजुभाऊ गुरनुले,  अन्नपूर्णा वाढई , नामदेव गावतूरे, डॉ प्रवीण गावतुरे, प्रमोद निकुरे व अशोक शेंडे उपस्थित होते.

मान्यवरानी श्री भगवानजी वाढई याच्या जीवनचरित्रा वर प्रकाश टाकला.तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचं गौरव करण्यात आला.डॉ. राकेश गावतुरे आणि डॉ अभिलाषा गावतुरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन सुद्धा केले.

कार्यक्रमाच्या अगोदर 75 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गरजू विद्यार्थ्यांना बुक पेन व पेन्सिल चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज राऊत तर प्रास्ताविक प्रेरणा वाढई तर त्यांचा जीवनपट नेकराम वाढई यांनी लोकांसमोर मांडला.जसं आपण लहान मुलांच्या आनंदासाठी त्यांचे वाढदिवस साजरे करतो. तसेच आपल्या वृद्ध आई बाबांचे अभिष्टचिंतन सोहळे साजरे करावे. त्यांच्या मरणानंतर आपण त्यांची तेरावी, श्राद्ध करतो तसेच त्यांच्या हयातीत त्यांचे वाढदिवस व इतर अशे सोहळे साजरे करून त्यांना आनंदित करावे. व अशी परंपराच आपल्या समाजात घरोघरी राबवावे असे मत कार्यक्रमाचे सूत्रधार नेकराम वाढई यांनी या कार्यक्रमाच्या निमत्ताने व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनांनी झाली. तर लोकांसाठी सागर निकोडे, विधी निकोडे, ओम वाढई , जागृती मोहूर्ले, चैताली मोहूर्ले या बालगोपालांचा सुगम संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन वाढई , विद्या वाढई , रुपचंद निकोडे, चंदा निकोडे, महेंद्र आत्राम, अस्पाक सय्यद आदीनि विषेश मेहनत घेतली.