अग्नीशमन दलाचे वाहन पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला

शॉर्टसर्कीटमुळे लागली आग: नागरीकांनीही केली मदत कार्य

मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर मार्गावरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळील इलेक्ट्रीक डिपी वर शॉर्टसर्कीटमुळे अचानक लागलेली आग मूल नगर पालीकेच्या अग्नीशमन दलाचे वाहन पोहचुन विझविल्याने होणारा मोठा अनर्थ टळल्याने जवळपास असलेल्या व्यवसायीकांनी सुटकेचा श्वास सोडला.

उन्हाची दाहकता वाढताच आगीचे सत्र सर्वत्र पाहायला मिळत असतानाच मूल येथील चंद्रपूर मार्गावरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाजुला असलेल्या डिपीजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने खाली असलेल्या कचÚयामधुन आगीचा मोठा भडका उडला नागरीकांच्या समयसुचकता दाखवित पाणी आणुन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझली नाही, यावेळी मूल नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी अग्नीशमन वाहनाला पाचारण केले, काही क्षणात अग्नीशमन वाहन घटनास्थळी पोहचुन आग विझविली.

आग लागली त्याठिकाणी अनेक बेरोजगार ठेले उभे करून लहानमोठे व्यवसाय करीत आहे, अग्नीशमन वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचली नसती तर खुप मोठा अनर्थ घडला असता हे विशेष.