आज पासुन होणार श्रम संस्कार छावणीला प्रारंभ

महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांचे हस्ते होणार उदघाटन 

मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासुन अखंड सुरू असलेल्या परंतु गेल्या 2 वर्षापासुन कोरोना संक्रमनामुळे खंड पडलेल्या श्रम संस्कार छावणी शिबीराचे रविवारी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, सदर शिबीरात महाराष्ट्रातील सुमारे 34 जिल्हयातुन शिबीरार्थी सहभागी होणार आहेत.

1968 पासुन जेष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या संकल्पनेतुन सोमनाथ येथे आंतर भारती भारत जोडो श्रम संस्कार छावणीचे आयोजन अखंड सुरू आहे. येत्या 15 मे पासुन तर 22 मे पर्यंत सदर छावणी सुरू राहणार आहे. छावणीत जोडो भारत सह यात्री युवकांना बाबा प्रणित भारत जोडो यात्रेतील अनुभव कथन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र व्यतिरिक्त ओडिसा, गुजरात येथील 15 ते 79 वयातील सुमारे 400 हुन अधिक युवक, युवती सदर छावणीमध्ये सहभागी होणार आहेत. यावर्षी होणाÚया श्रम संस्कार छावणीत महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, श्रीमती केतकी घाटे, श्रीमती अमिता देशपांडे, श्री. अंशु गुप्ता (गुंज), दिल्ली, श्री. मंदार भारदे नाशिक, भारत जोडो सहयात्री, आनंदवनातील जेष्ठ कार्यकर्ते, ग्रामीण व शहरी भागातील शाश्वत विकास या विषयाचे अनुशंगाने शिबीरार्थीशी संवाद साधतील सदर छावणीचे आयोजन कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे यांच्या नेतृत्वात करण्यात येणार असल्याचे शिबीर समन्वयक रविंद्र नलगंटीवार यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना सांगीतले.