मूल नगर पालीकेत भाजपाचा सफाया करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

……तरीही भाजपा गप्प का? नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

मूल (प्रतिनिधी) : मूल नगर पालीकेचा कार्यकाल डिसेंबर मध्ये संपुष्टात आला, सध्या पालीकेचा कारभार प्रशासक आणि मुख्याधिकार्यामार्फत सुरू आहे. मागील कार्यकाळात नगराध्यक्षासह भाजपाचे 16 तर कॉंग्रेसचे केवळ 1 नगरसेवक निर्वाचीत झाले होते. मात्र येत्या काही महिण्यावर मूल नगर पालीकेची निवडणुक होणार आहे, त्यासाठी भाजपाचा सफाया करण्यासाठी राजकीय पक्षांनी मोचेबांधणीला सुरूवात केली आहे. परंतु भाजपाकडुन पाहिजे तसा सध्यातरी प्रयत्न होताना दिसून येत नाही यामुळे भाजपाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.

मूल नगर पालीकेच्या वार्ड फाडणीवर आक्षेप घेणे सुरू आहे, मागील निवडणुकीत 8 प्रभाग तर 17 नगरसेवक निवडुन दयायचे होते. मात्र यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत 10 प्रभाग पाडण्यात येणार असुन 20 नगरसेवक निवडुन दयायचे आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन व मूल शहराच्या विकासकामांमुळे मागे झालेल्या निवडणुकीत भाजपाला 16 जागेवर विजय संपादन केले मात्र एका नगरसेविकेला शासनाने अपात्र ठरविल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला ति जागा गमवावी लागली. मूल शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळेच सदर पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.

काही महिण्यावर होवु घातलेल्या मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत भाजपाचा सफाया करण्याच्या दुष्टीने एका राजकीय पक्षाने मूल शहरातील एका मोठया धनिक व्यवसायीकाला निवडणुक रिंगणात उतरवुन त्यांच्या धनावर निवडणुकाचा ‘‘गेम’’ खेळण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच एक माजी नगरसेवक, एक मोठया राजकीय नेत्याचा मुलगा व एक खाजगी शाळेतील कर्मचारी हे उमेदवार आतापासुनच फायनल केल्याची चर्चा आहे, सर्वच धनवान आणि तगडे उमेदवार न. प. च्या निवडणुक रिंगणात उतरवुन त्यांच्या पैशांवर उर्वरीत उमेदवार निवडुण आणण्यासाठी रणनिती आखल्या जात असल्याची चर्चाही राजकीय वतुळात ऐकायला मिळत आहे, असे असतानाही भाजपाचे पदाधिकारी गप्प का? असा प्रश्न यानिमीत्ताने चर्चीला जात आहे.

राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हा गृहक्षेत्र आहे, त्यांच्या पुढाकारातुन मुल शहराचा “न भुतो ना भविष्यती” असा विकास झाला, त्यांच्यामुळेच मूल शहराला स्मार्ट सिटी म्हणुन ओळखल्या जाते, मात्र भाजपाचे काही स्थानिक पदाधिकारी विकासाच्या बाबतीत पाहिजे तसे सक्षम नसल्याने इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडुन मूल नगर पालीकेत आपले वर्चस्व प्रस्तापित करण्याच्या तयारीला लागले आहे, असे असतानाही भाजपाने त्याकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी भविष्यात मोठे डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.