12 वर्ष होऊनही पाळणा हलला नाही, पत्नी दुसऱ्या लग्नाच्या शोधात तर पतीची आत्महत्या

चंद्रपूर जिल्हातील सिमूर तालुक्यातील घटना

चंद्रपूर  (प्रतिनिधी) :  लग्न होऊन 12 वर्ष झाले परंतु मुलबाळ होत नव्हते, याचा संपूर्ण दोष पतीवर देऊन परपुरुषांशी विवाह करण्याचा पत्नीनें बेत रचला, यामुळे समाजात नाचक्की होते म्हणून पतीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना चिमूर तालुक्यात घडली. गोविंदा सदाशिव धानोरकर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गोविंदा सदाशिव धानोरकर वय 40 वर्ष यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र त्यांना मूलबाळ झाले नाही. नवऱ्यामध्ये दोष असल्याचं पत्नी वारंवार बोलून दाखवत असत, परंतु  पत्नीला मूल हवे होते. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी त्याची पत्नी लग्नासाठी नातेवाईकाच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही.  आणि एका दिवशी पत्नीने पती ला फोन करुन दुसरं लग्न करणार असल्याचे सांगितले. हे ऐकून गोविंदा बिथरला आणि समाजात बदनामी होईल म्हणून सायकलने गावाच्या बाहेर गेले आणि मध्ये सायकल टाकून विहिरीत उडी घेत आत्महत्या केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्याचे एसएचओ मनोज गभणे तपास करत आहेत.