नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कांग्रेस पॅनलचा विजय

13 पैकी 13 ही जागेवर विजय मिळवित विरोधकांचे केले पाणीपत

मूल (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रासाठी महत्वाची मानली जाणाऱ्या सेवा सेहकारी संस्थेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पॅनलच्या उमेदवारांचा विजय झालेला असुन 13 पैकी 13 ही जागेवर विजय मिळविलेला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपुर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात व पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, आणि नांदगांव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रशांत बांबोळेे यांच्या सहकार्याने नादगांव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणुक पार पडली. यानिवडणुकीत सुनंदा सुनील काळे, सखुबाई गुडडी गम्पलवार, गंगाधर कवडू शिंदे, प्रकाश आंबटकर, प्रभाकर अमलवार, सदाशिव मशाखेत्री, वसंत मोहूर्ले, नीलकंठ नरसपुरे, संदीप रायपल्ले, अशोक उमक, मंदाबाई लाकडे, त्रिमूर्ती नाहगमकर विजयी झाले.

विजयी उमेदवारांचे तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून कांग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, मूल पंचायत समितीचे .माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, नांदगांव ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच प्रशांत बांबोळे व सहकार्य करणारे सर्व कांग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे तालुका कांग्रेसच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रशांत बांबोळे कॉंग्रेसचे कि भाजपाचे?
कॉंग्रेसचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी सहकार्य करणारे प्रशांत बांबोळे हे भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या शितल बांबोळे यांचे पती आहेत, त्यांनी भाजपाचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडुन कॉंग्रेसचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी सहकार्य केले यामुळे ते सध्या कॉंग्रेसचे कि भाजपाचे असा  प्रश्न यनिमित्याने  चर्चीला जात आहे.