कळमना येथील बांबू आगाराला भीषण आग : आगीमुळे पेट्रोल पंपाला धोका

अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न : बल्लारपूर पेपर मिलचे लाखोंचे नुकसान

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर – कोठारी मार्गादरम्यान बल्लारपूर पेपर मिलचे बांबू साठवणूक आगार आहे. पेपर मिलचा कच्चा माल म्हणून बांबू व लाकूड आगार बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे आहे. या आगाराला रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बल्लारपूर पेपर मिल उद्योगाचे कोटीवधीचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या पाच दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला. मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नाही.

बल्लारपूर – कोठारी मार्गांवर कळमना गावाजवळ कित्येक वर्षापासून बल्लारपूर पेपर मिलचे बांबू डेपो आहे. पेपर मिल उद्योगाला लागणारा कच्चा माल म्हणून बांबू व लाकडाचा उपयोग केला जातो. येथे जवळपास हजारावर ट्रक वाहतूक केलेला बांबू साठवणूक केला आहे. या बांबू आगाराला रविवारी दुपारी ३ वाजता अचानक आग लागली.

याची माहिती बल्लारपूर चे तहसीलदार संजय राईचंवार, नायब तहसीलदार साळवे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना देण्यात आली. तहसील व पोलीस प्रशासनाने लगेच घटना स्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचरण केले. तब्बल पाच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने अख्खा साठवणूक केलेला बांबू आगीच्या भक्षस्थानी आला. यामुळे बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोन कळमना गावा पर्यंत दिसून येत होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने भीषण आग नियंत्रणात आणली नाही.

आगीमुळे पेट्रोल पंपाला धोका
कळमना बांबू डेपो जवळ भारत पेट्रोल पंप आहे. बांबू आगारातील आगीमुळे पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी पळ काढला.चंद्रपूर येथील महेंद्र फुलझेले नामक व्यक्तीचा हा पेट्रोल पंप असून त्याच्या पेट्रोल पंपावर १३०० लिटर पेट्रोल तर १५५० लिटर डिझेल असल्याची माहिती आहे.बांबू डेपो मधील आगीचे रौद्ररूप पाहून कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंप लगेच सोडले. पेट्रोल पंपवरील पेट्रोल व डिझेल साठवणूक टाकीला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपाचा स्फोट झाल्यास कळमना गाव देखील आगीच्या कचाट्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

‘ बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील बांबू डेपोला रविवारी दुपारी ३ वाजता दरम्यान भीषण आग लागली. याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली. लगेच अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. पाच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. या आगीत बल्लारपूर पेपर मिल उद्योगाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नेमके नुकसान किती झाले, याचा अंदाज पूर्ण आग आटोक्यात आल्यावर माहित होईल.
– संजय राईचंवार
तहसीलदार, बल्लारपूर.