तालुक्यातील अनेक युवकांनी बांधली हाताला घडी

राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश

मूल (प्रतिनिधी) : घराघरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पोहचविण्याच्या दृष्टीने पक्षाचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ यांनी तालुक्यातील अनेक युवकांना राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पक्षांची घडी हाताला बांधुन दिली, नाम. तनपुरे यांनी पक्ष प्रवेश करणाÚया युवकांना पक्ष बळकट करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ यांचेसह पक्षाचे नेते उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा श्री साई बोरवेल्सचे संचालक बंडू साखलवार, युवा सामाजिक कार्यकर्ते रितिक पोगूलवार, रुपेश एडनूतलवार, चेतन लाकडे, देवानंद गुरनूले, दीपक गुरनूले, शिवसेनेचे जानाळा येथील नेते दिपक घोंगडे, पवन कारेंगवार, आखीप पठाण, नीरज तुपकर, विक्रांत नाकतोडे यांनी पक्ष प्रवेश केला.

पक्षप्रवेश करणाÚया युवा कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, शहराध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, ,महिला तालुकाध्यक्ष नीता गेडाम, महिला शहरध्यक्ष अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार, तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे, तालुका उपाध्यक्ष दुशांत महाडोळे, शहर महासचिव प्रदीप देशमुख यांनी अभिनंदन केले.