आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था बेंबाळ काँग्रेसप्रणीत परिवर्तन पॅनलच्या ताब्यात

कॉंग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलला ११ जागा तर भाजपाचे चंदु मारगोनवार गटाला फक्त २ जागा

मूल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सहकार क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था बेंबाळची निवडणूक नुकताच अविरोध झाली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे ११ संचालक अविरोध निवडून आले तर भाजपाच्या चंदू मारगोनवार गटाचे केवळ दोनच संचालक अविरोध निवडून आले.

सदर आदिवासी सोसायटीवर मागील पंधरा वर्षापासून भाजपाचे वर्चस्व होते. परंतु भाजपाचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांनी उमेदवारी दिलेल्या उमेदवारांपैकी सात उमेदवारी फॉर्म चुकीचे भरल्याने परिवर्तन पॅनलचे ७ उमेदवार अविरोध निवडून आले होते. भाजपाचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे उमेदवार माणिक सखाराम भडके यांनी आपले नामांकन मागे घेतल्यामुळे मदन जपान उराडे यांची अनुसूचित जाती प्रवर्गातून अविरोध निवड झाली. सर्वसाधारण आदिवासी खातेदार कर्जदार मतदारसंघातून परिवर्तन पॅनलचे रामदास तुकाराम मडावी, पुंडलिक शंकर मेश्राम, विकास गुरुदास सिडाम, राजेश्वर जनार्धन गेडाम, धनराज चंदू गेडाम अविरोध निवडून आले. तर भाजपकडून शामराव गोसाई आत्राम हे अविरोध निवडून आले. आदिवासी महिला राखीव मतदार संघातून परिवर्तन पॅनलचे शारदाबाई धर्मराव मडावी, निर्मला घनश्याम गेडाम तर सर्वसाधारण बिगर आदिवासी यामधून परिवर्तन पॅनलचे सौ. उषा योगेश शेरकी व नंदू कृष्णाजी आकनुरवार यांची अविरोध निवड झाली. विमुक्त जाती भटक्या जमातीमधून ऋषी करेवार यांनी आपले नामांकन वापस घेतल्यामुळे विस्तारी मल्ला चिल्लरवार हे अविरोध निवडून आले. अनुसूचित जमातीमधून नामदेव गोसाई आत्राम, इतर मागासवर्गीय मतदार संघातून चंदु गजानन मारगोनवार हे भाजपा पुरस्कृत दोन उमेदवार अविरोध निवडून आले.

अध्यक्षाची निवड नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळातून करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणुन विकास गुरुदास सिडाम यांची अविरोध निवड तर उपाध्यक्ष म्हणून मदनकुमार जपान उराडे यांची अविरोध निवड करण्यात आली. कित्येक वर्षापासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या सोसायटीवर काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलचे वर्चस्व आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर मागील वर्षापासून बेंबाळ परिसरातील होत असलेल्या भाजपाच्या राजकीय पिछाडीमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यात चिंतेचे वातावरण बनले आहे.

सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसचे नेते संतोषसिंह रावत, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील वाढई,रुमदेव पाटील गोहणे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन नीलमवार, माजी सरपंच योगेश शेरकी, उमाकांत मडावी, मदन उराडे,पराग वाढई, विजय बोम्मावार, किशोर नंदिग्रामवार, विकास वाळके,अजय भसारकर, राकेश कुभारे, मुरलीजी राऊत, अशोक आकेवार, गिरिधर येरमे, मंगरुजी कुरीवार, चांगदेव केमेकार, नितीन मोहुर्ले, माणिक भडके व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी परिश्रम घेतले.

निवडून आलेल्या काँग्रेसच्या सर्व संचालक मंडळाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत, राकेशभाऊ रत्नावार, घनश्याम येनुरकर, उलगुलान संघटनेचे प्रशांत उराडे, युवक तालुका काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार तसेच काँग्रेसच्या व परिवर्तन पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या व अभिनंदन करण्यात आले.