कापड दुकानासह ब्युटी कलेक्शनला आग लागुन लाखो रूपयांचे नुकसान

मूल (प्रतिनिधी) : येथील सोमनाथ मार्गावरील विलेन विला या कापड दुकानासह जवळ असलेल्या लक्ष्मी ब्युटी कलेक्शन या प्रतिष्ठाणाला अचानक आग लागल्याने दोन्ही प्रतिष्ठाने जळुन खाक झाल्याची घटना शनिवारी रात्रौ 1 वाजता दरम्यान घडली. सदर आगीमुळे दोन्ही प्रतिष्ठाण व्यवसायीकांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले.

मूल येथील सोमनाथ मार्गावर मयूर शेख यांचे विलेन विला कापड दुकान तर विश्वजीत उडान यांचे लक्ष्मी ब्युटी कलेक्शन हे प्रतिष्ठाण काही दिवसांपासुन सुरू केले होते. दरम्यान शनिवारी रात्रौ 1 वाजता दरम्यान अचानक आग लागल्याने मूल, सावली, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र अग्नीशमन वाहन येत पर्यंत संपुर्ण दुकाने जळुन खाक झालीत. सदर घटनेमुळे प्रतिष्ठाण व्यवसायीकांचे मोठे आर्थीक नुकसान झाले.

आगीवर नियंत्रणात मिळविण्यासाठी मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिह राजपूत नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अभय चेपूरवार व कर्मचाÚयांनी सहकार्य केले.