सेवानिवृत्त मुख्याध्यापक रूपेश्वर गुरनुले यांचे निधन

मूल (प्रतिनिधी) : येथील नवभारत कन्या विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरूनले यांचे पती रूपेश्वर बाबाजी पाटील गुरनुले वय 73 वर्षे यांचे शनिवारी सकाळी 6.30 वाजता दरम्यान निधन झाले.

तालुक्यातील फिस्कुटी येथील रहिवासी असलेले रूपेश्वर बाबाजी पाटील गुरनुले हे काही दिवसांपासुन आजार होते, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, मुलगा फिस्कुटीचे सरपंच नितीन गुरनुले, सचिन गुरनुले, मुलगी, जावई, सुना असा आप्तपरिवार आहे.

त्यांच्यावर मूल येथील उमा नदीच्या तिरावर दुपारी 2 वाजता दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.