पोलीसांच्या चौकशीत मृतदेहाची ओळख पटली
मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोसंबी शेतशिवारात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
मूल-सोमनाथ मार्गांवरील कोसंबी शेतशिवारातील गुरनुले यांच्या शेतात एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने मूल पोलीसांनी कसुन चौकशी केली असताना सदर मृतदेहाची ओळख पटली असुन मूल येथील वार्ड नं. 14 मधील रहिवासी मार्कंडी रामप्रसाद सोनुले यांचा आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.