‘‘ति’’ आग नेमकी कशामुळे?

सिसीटीव्हीत चित्रीत झालेले ते 3 व्यक्ती कोण? : शहरात चर्चा

मूल (प्रतिनिधी) : येथील सोमनाथ मार्गावरील त्रिमुर्ती प्रॉपर्टी डिलर्सच्या मालकीच्या इमारतीमध्ये लक्ष्मी ब्युटी कलेक्शन आणि विलेन विला कापड हे प्रतिष्ठाण आहे. हे दोन्ही प्रतिष्ठाणाला आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झालेले आहे, मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे अजुनही गुलदस्तात आहे, मात्र आग लागायच्या काही वेळाआधी त्याच परिसरातुन बेसुमार धावत जाणारे 3 व्यक्ती कोण? याघटनेमुळे मूल शहरात वेगवेगळया चर्चेला उधाण आले आहे.

मूल येथील विलेन विला या प्रतिष्ठाणचे मालक मयुर शेख आणि लक्ष्मी ब्युटी कलेक्शनचे मालक विश्वजित उडान यांच्या दोन दुकानामध्ये प्लॉयवुडची भिंत उभारण्यात आलेली आहे. दरम्यान याठिकाणाहुन शनिवारी रात्रौच्या दरम्यान शटर मधुन धुर निघत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीसांना दिसले. पोलीस कर्मचाÚयांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत आणि नगर प्रशासनाला कळविले. सदर आगीमुळे दोन्ही प्रतिष्ठाणाची मोठी नुकसान झालेली आहे, मात्र सदर आग नेमकी कशामुळे लागली हे अजुनही गुलदस्तात आहे. परंतु आग लागायच्या काही वेळाआधी त्याच परिसरातुन 3 व्यक्ती बेसुमार धावत जाणारे कोण? असाही प्रश्न याप्रकरणावरून समोर येत आहे.

दे धक्का एक्सप्रेसकडे सदर परिसरातुन जाणाÚया व्यक्तींचे सिसीटीव्हीत चित्रीत झालेले व्हिडीओ प्रााप्त झाले आहे. रात्रौच्या वेळी यापरीसरातुन सदर व्यक्ती धावत जाण्याचे कारण काय? असाही सवाल उपस्थित झाला असून सदर आगीबाबत शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लावल्या जात आहे. याप्रकरणाची चौकशी केल्यास आगीचे नेमके कारण स्पष्ट होवु शकतो ऐवढे मात्र नक्की.