मूलच्या बस स्थानकावर प्रवासी पाससाठी मारव्या लागतात चकरा

मूलचे बस स्थानक केवळ शोभेची वस्तु

मूल (प्रतिनिधी) : परिवहन महामंडळाच्या बसेस मधुन चार किवा सात दिवस प्रवासी पास काढुन प्रवास केल्यास प्रवाश्याना आर्थीक सवलत मिळतो, सदर सवलत मिळावी यासाठी मूल येथे प्रवासी पास काढायला गेल्यास कुठलेही पास उपलब्ध नसल्याचे सांगुन वेळ मारून नेण्याचा प्रकार मूल बस स्थानकावर सुरू असल्याने प्रवाश्याना चंद्रपूर येथे जावुन प्रवासी पास काढावा लागत आहे, यामुळे प्रवाश्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मूल बस स्थानकावरून परिवहन विभागाच्या शेकडो बसेस रोज ये-जा करीत असतात, करोडो रूपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या बस स्थानकावर प्रवाश्याच्या सुविधेसाठी 2 पुरूष तर 1 स्त्रि वाहतुक नियंत्रकाची नेमणुक केलेली आहे. याठिकाणाहुन शाळकरी व प्रवासी वाहतुक करणारे प्रवासी मोठया संख्येने प्रवास करीत असल्याने त्यांना लागणाÚया पास साठी स्वतंत्र पास कक्ष तयार करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासुन याठिकाणाहुन प्रवाश्यांना प्रवासी पास काढुन दिल्या जात नसल्याने, आवश्यकता भासल्यास चंद्रपूर वरून प्रवासी पास काढावे लागत आहे. यामुळे प्रवाश्यांना मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागत आहे.

मूलच्या बसस्थानकावर प्रवासी पास देण्यास नकार: राहुल जिरकुंटवार
महाराष्ट्र दर्शन करायचे असल्याने प्रवासी पास काढण्यासाठी मूल येथील बस स्थानकावर गेलो असता, त्याठिकाणी असलेल्या मॅडमनी मला पास उपलब्ध नसल्याचे सांगीतले, यामुळे चंद्रपूर येथे जावुन 4 दिवसाचा प्रवासी पास काढलो, मात्र तेथील कर्मचाÚयांनी मूल येथुनच प्रवासी पास का काढले नाही म्हणुन विचारले असता मूल येथे उपलब्ध नसल्याचे सांगितलो मात्र त्यांनी मूल येथेच उपलब्ध असल्याचे सांगीतले. यामुळे प्रवासी पाससाठी विनाकारण त्रास दिल्याचा प्रकार मूल बसस्थानकावर घडल्याचे मूल येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल जिरकंुटवार यांनी दे धक्काशी बोलताना सांगितले.

पास उलब्ध नसल्याने चौकशी विभागात कार्यरत: श्रीमती विभा बोथले
मागील काही दिवसांपासुन मूल येथील बस स्थानकावर प्रवासी पास उपलब्ध नसल्याने व एखादावेळेस वाहतुक नियंत्रक सुट्टीवर असल्यास त्यांच्या ठिकाणी मला चौकशी विभागात कार्यरत राहावे लागत असल्याची प्रतिक्रिया मूल बस स्थानकावरील महिला कर्मचारी विभा बोथले यांनी सांगीतले.