शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त राजोलीत अभिवादन

ग्राम पंचायतचा पुढाकार

विकास रणदिवे, राजोली
मूल तालुक्यातील राजोली ग्राम पंचायतच्या वतिने शिवराज्याभिषेक दिनानिमीत्ताने शिवाजी महाराजांना अभिवादन करून गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रांगणात गुढी उभारून सुशासन गाव कारभाराची शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाम पेशट्टीवार, ग्राम पंचायतचे ग्राम विकास अधिकारी गुलाब चहारे, ग्राम पंचायत सदस्य उमेश सोयाम, अंजनाताई मेश्राम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन संगणक चालक राहुल पुट्टावार यांनी केले, उपस्थितांचे आभार मधुकर मोहुर्ले यांनी मानले.