3 दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक सिंदेवाही-मूल मार्गावर भिषण अपघात

1 ठार 1 गंभीर जखमी

मूल (प्रतिनिधी) : सिंलेंडर भरून मूल कडे येणाऱ्या दुचाकी वाहनासह दोन दुचाकीला अज्ञात वाहनानी धडक दिल्याने 1 जण जागीच ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मूल सिंदेवाही मार्गावर मूल पासुन 2 किमी अंतरावर सोमवारी सकाळी 10.30 वाजता दरम्यान घडली. आदित्य प्रकाश काळबांधे वय 22 वर्षे हे अपघातात ठार झाले, बंटी अलगुनवार वय 22 वर्षे हे गंभीर जखमी आहे तर 2 जण किरकोळ जखमी झालेत. सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले, व मृत्तकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढीत तपास मूल पोलीस करीत आहे.