विसापुरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन

सुशासन गाव कारभाराची शपथ

विसापूर (प्रतिनिधी) : विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रांगणात गुढी उभारून सुशासन गाव कारभाराची शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य रिना कांबळे, शशिकला जीवने, विद्या देवाळकर, संदीप काकडे, प्रदीप गेडाम, गजानन पाटणकर, रमा मुंजेकर, अशोक ठुणेकर, ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना करून रयतेच्या या हितासाठी राज्य कारभार केला. प्रजा ही विकासाच्या केंद्र असावी म्हणून प्रयत्न केला. शिवराज्याभिषेक करून जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गाव कारभार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी कटीबद्ध राहून गाव विकास करण्याची गरज आहे, असे त्यांनी मनोगत वक्त करताना सांगितले. दरम्यान शिवराज्याभिषेक गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संतोष निपुंगे यांनी केले.