मूल-सावली तालुक्यातुन कत्तलीसाठी नेणाऱ्या गोधन तस्कराना आशीर्वाद कुणाचा?

शेतीसाठी बैल घेणे झाले सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर !

मूल (प्रतिनिधी) : खरीप हंगालाला सुरूवात होत असतानाही मूल-सावली तालुक्यातुन मोठया प्रमाणावर कत्तलीसाठी गोधन तस्करीचा गोरखधंदा सुरूच आहे, मात्र सदर तस्करी नेमकी कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे हे सद्या तरी गुलदस्तात आहे. परंतु गोधन तस्करीमुळे शेती करणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.

मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर शेती करून शेतकरी उत्पन्न घेतात.  ग्रामीण भागात गोधनाच्या आधारे शेती मोठया प्रमाणावर केली जात आहे, यासाठी बहुतांष घराघरात गोधनाचे पालनपोषण केले जाते, सध्या खरीप हंगाला सुरूवात होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहे, यामुळे शेती करण्यासाठी बिजाई, खताची जुळवाजुळव शेतकरी करीत आहे, यासाठी अनेकांना स्वताःच्या घरचे अतिरीक्त गोधन विक्री करावे लागत आहे, तर काही शेतकऱ्याना इंधनचे दर वाढल्यामुळे यंत्राचा वापर न करता बैल खरेदी करून शेती करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र मूल-सावली तालुक्यात मोठया प्रमाणात बंद कंटेनर मधुन कत्तलीसाठी गोधनाची तस्करी सुरू असल्याने बैल विकत घेणे शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचे झालेले आहे.

माहे जानेवारी महिण्यात मूल तालुक्यातुन तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कत्तलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थनिक गुन्हे शाखेने पर्दापाश करीत सुमारे 48 जनावरांची सुटका केलेली आहे हे विशेष.

गो माता म्हणुन गोधनाची तस्करी करणाऱ्यावर मूल आणि सावली तालुक्यातील काही संघटना वॉच ठेवुन होत्या परंतु काही दिवसांपासुन त्यांनाही गोधन तस्करी करणाऱ्यांनी झोपवून ठेवले की काय? असा प्रश्न सध्या त्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालुन तालुक्यातुन कत्तलीसाठी होणारी गोधन तस्करी थांबवावी अशी मागणी नागरीक करू लागले आहे.