शेतकऱ्याचा शेतशिवारात जळून मृत्यू

शेतीची मशागत करताना घडला प्रकार :  बल्लारपूर तालुक्यातील घटना

 बल्लारपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील अल्पभूधारक शेतकरी मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीसाठी शेतशिवारात गेला. शेतात वखरणी करून प्रहाटीचे पुजने जाळत असताना आगीचा लोळ अंगावर आल्याने शेतकऱ्याचा शेतशिवरातच जळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११ वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील शेतशिवारात घडली. सुधाकर उद्धव पोडे ( ५५)  रा. नांदगाव ( पोडे ) ता. बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. त्याच्या पश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.

सुधाकर पोडे यांचे कडे दोन दीड एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्यासाठी भर उन्हात लगबग सुरु झाली आहे.आज बुधवारी सकाळी ८ वाजता सुधाकर पत्नी सोबत बंडीने वखर घेऊन शेतात गेला. शेतजमीन वखरून प्रहाटीचे पुंजने जमा करून जाळत होता. लगतच्या शेतात त्याची पत्नी पुंजने जमा करत होती. दरम्यान जमा झालेले पुंजने सुधाकर जाळत होता. ध्यानीमणी नसताना काठीने पुंजने जाळत असताना हवेच्या झोताने आगीचा लोळ त्याच्या अंगावर आल्याने डोक्यापासून कंबरे पर्यंत जळाला. शेतीची मशागत करताना सुधाकर पोडेचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेची माहिती माजी सभापती गोविंदा पोडे यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक शैलेश जगताप, पोलीस शिपाई लक्ष्मण रामटेके व मनोहर कांबळी यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला. त्याचे शव उतरीयतपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.

     

शेतीच्या मशागती दरम्यान दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम तोंडावर आला आहे. मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. अशातच शेतीच्या मशागतीसाठी बळीराजाची लगबग वाढली आहे. नांदगाव ( पोडे ) येथील अल्प भूधारक शेतकरी सुधाकर पोडे यांनी देखील स्वप्न उराशी बाळगून शेतीच्या मशागतीला शेतशिवारात गेला. शेतातील उत्पन्न हेच कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन होते. शेतीच्या उत्पन्नावर वर्षभराची तजवीज करण्याच्या प्रयत्नात त्याचा अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नांदगाव ( पोडे )  या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने सुधाकर पोडे यांच्या कुटुंबाला तातडीने मदत करावी, असी मागणी गावाकऱ्यांनी केली.