गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

मूल तालुक्यातील चितेगांव येथील घटना

विकास रणदिवे, राजोली
घरी कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील चितेगांव येथे शुक्रवारी सकाळी 9 वाजता दरम्यान उघडकीस आली. तेजस्विनी गोपाल मानकर वय 23 वर्षं असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे

मूल तालुक्यातील मौजा चितेगांव येथील गोपाल मानकर यांचा प्रेमविवाह मागील वर्षी तेजस्विनी सोबत झाला. गोपाल हा ट्रकवर वाहक म्हणून काम करुन आपला संसार सुरळीत चालवीत असताना आज (शुक्रवारी) सकाळी घरात कुणीही असताना तेजस्विनी गोपाल मानकर या विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, घटनेची माहिती मूल पोलिसांना देण्यात आली. मूल पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.