गोवंश वाहतूक करताना दोन आरोपीवर गुन्हा दाखल

१८ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त :  दे धक्काच्या बातमीचा इफेक्ट 

सावली (प्रतिनिधी) :  मूल सावली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गोधन वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वरून सावली पोलिसांना मिळाली होती यावरून सावली पोलीसानी खेडी फाट्यावर नाकाबंदी करुन 34 गोवंशाची सुटका करुन 2 आरोपीना अटक केली आहे, मूल सावली तालुक्यातून कत्तलीसाठी नेणाऱ्या गोधन तस्कराना आशीर्वाद कुणाचा? या मथड्याखाली 3 दिवसापूर्वी बातमी प्रकाशित केली होती हे विशेष.

मूल आणि सावली तालुक्यामधून आठवड्यातून 2 ते 3 दिवस कन्टेनर नी गोधन वाहतूक होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. दरम्यान ११ जुन च्या पहाटे 4 वाजता खेडी फाटा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिका अर्जुन इंगळे, सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली  नाकाबंदी केली असता एम एच 34 बी जी 09890  हा आयशर  ट्रकमधून सुमारे  34 जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आले.

सदर प्रकरणी सावली पोलीस स्टेशन येथे 2 आरोपींवर महाराष्ट्र पशू संरक्षण अधि, प्राणी छळ प्रति.अधि , महा.पोलीस अधि, मोटर.वाहन.कायदा  च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर वाहन व जनावरे असा एकूण 18 लाख 40 हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील मिळून आलेल्या  एका आरोपीस अटक करून त्यास न्यायालयाने एमसीआर वर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी  मल्लिका अर्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दर्शन लाटकर, मोहन दासरवार, धीरज पिदुरकर, चालक मरस्कोल्हे यांनी केली

दे धक्का च्या बातमीचा दणका
मागील काही दिवसापासून मूल सावली तालुक्यातूम मोठ्या प्रमाणावर गोधनाची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जनावराच्या मदतीने शेती करणे अवघड झाले होते. 3 दिवसापूर्वी दे धक्का एक्सप्रेस मध्ये याबाबत वृत्त प्रकाशीत केले होते, त्या वृत्ताचा दणका गोधन तस्कराना बसल्याची चर्चा आहे.