विवाहीत युवकाची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या

राजोली येथील घटना

विकास रणदिवे, राजोली
मूल तालुक्यातील मौजा राजोली येथील एका विवाहीत युवकाने विहीरीत उडी घेवुन जिवनयात्रा संपविल्याची घटना राजोली येथील माना समाज चौकात शनिवारी रात्रौ 9 वाजता दरम्यान घडली. सुभाष नामदेवराव धारणे वय 42 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे.

राजोली येथील सुभाष धारणे हे आई-वडील, पत्नी व 1 मुलगा आणि 2 मुलीसह राजोली येथेच राहुन मोलमजुरी करीत होता, मात्र शनिवारी रात्रौ तो माना समाज चौकातील विहीरीमध्ये उडी घेवुन आत्महत्या केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला देण्यात आली होती, माहितीच्या आधारे मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला व पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.