देवनिल विद्यालयाचा 100 टक्के निकाल

स्वराज जेंगठे 91 टक्के गुण मिळवुन शाळेतुन प्रथम, व मराठी शाळेतुन तालुक्यातुन प्रथम

ओमदेव मोहुर्ले, टेकाडी
माहे मार्च महिण्यात पार पडलेल्या 10 वीच्या परिक्षेचा निकाल शिक्षण विभागाने घोषीत केला असुन मूल तालुक्यातील टेकाडी येथिल देवनिल विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असुन विद्यालयाचा स्वराज हितेश जेंगटे याने ,91 टक्के गुण प्राप्त करून शाळेतुन प्रथम व मराठी शाळेमधून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकविला.

टेकाडी येथील देवनिल विद्यालयाचा निकाल मागील अनेक वर्षापासुन 100 टक्के लागत आहे, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी प्रयत्न करीत आहे, यावर्षी शाळेने 100 टक्के निकाल दिलेला आहे. विद्यालयाचा स्वराज हितेश जेंगठे 91 टक्के, निकिता रवी शेंडे 90.80, श्रेया भारत वाळके 87.80 टक्के गुण प्राप्त करून शाळेतुन प्रथम, व्दितीय आणि तृतिया येण्याचा मान मिळविला आहे.

स्वराज हितेश जेंगठे यांची आर्थिक परस्थिती अत्यंत बिकट असुनही परिस्थितीवर मात करून अत्यंत जिद्दीने त्यांना मराठी शाळेमधुन तालुक्यात प्रथम आलेला आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर, आई वडील आणि आप्तेष्टांना देतो.