मल्लेशच्या अवैध दारूविक्रीमुळे राजोलीतील वातावरण प्रदुर्षीत

महिलांच्या आंदोलनामुळे काही काळ अवैध दारूविक्री होती बंद

राजोली (प्रतिनिधी) : मूल तालुक्यातील मौजा राजोली येथे अवैध दारूविक्री मोठया प्रमाणावर सुरू आहे मात्र स्थानिक प्रशासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे, यामुळे मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री करणाऱ्या मल्लेशच्या दारूविक्रीमुळे राजोलीतील वातावरण प्रदुषित होत आहे. सदर अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी महिलांकडुन होत आहे.

चंद्रपूर जिल्हयात दारूबंदीच्या काळात मोठया प्रमाणात अवैध दारूविक्रीने डोक वर काढले होते. महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हयातील आडवी बाटल, उभी केली आणि जिल्हयामध्ये शासनमान्य दारूविक्री करण्यास शासन मान्यता दिली, मूल तालुक्यात सरकार मान्य दारू दुकानातुन दारूविक्री सुरू असतानाही, राजोली येथे मात्र अवैध दारूविक्री बंद करण्याचे नांव घेत नाही, दरम्यान काही दिवसापुर्वी राजोली येथील महिलांनी राजोलीतील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी पुढे करीत सरपंच जितेंद्र लोणारे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला, दरम्यानच्या काळात काही दिवस मल्लेशची अवैध दारूविकी बंद झाली, परंतु काही दिवसातच अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे, याकडे स्थानिक प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने महिलांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेवु: सरपंच जितेंद्र लोणारे
राजोलीतील अवैध दारूविक्रीसंदर्भात महिलानी एकत्र येवुन बंद करण्याची मागणी रेटुन धरली होती, यावेळी तंटामुक्त समिती, पोलीस पाटील आणि मूल पोलीस स्टेशनला माहिती दिली होती, आणि राजोलीतील अवैध दारूविक्री बंद झालेली होती मात्र सध्या सुरू असलेली अवैध दारूविक्री बद्दल पुढाकार घेवुन अवैध दारूविक्री बंद करू अशी प्रतिक्रिया राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे यांनी दे. धक्का एक्सप्रेसशी बोलताना दिली.