विज पडुन युवा शेतकरी ठार

पोंभुर्णा (प्रतिनिधी) : शेतावरून मशागती करून परत येत असताना एका युवा शेतकऱ्यांच्या अंगावर विज पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सातारा तुकुम येथे सकाळी 11.30 वाजता दरम्यान घडली. मधुकर देवाजी परचाके वय 43 वर्षे असे विज पडुन ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकुम येथील मधुकर देवाजी परचाके वय 43 वर्षे यांच्यांकडे सातारा भोसले शेतशिवरातील बालाजी तलाव जवळ शेती आहे, सदर शेतामध्ये मशागतीचे काम आटोपुन परत सातारा तुकुम येथे घरी परत येत असताना मध्येच विज पडल्याने ते जागीच ठार झाला.

सदर शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी आणि तिन मुली आहेत, घरचा कमावता व्यक्तीवर विज पडुन ठार झाल्याने कुंटुबावर मोठे आर्थीक संकट कोसळले आहे.