कुजलेल्या अवस्थेत आढळला ट्रॅक्टर मजुराचा मृतदेह

बंद असलेल्या नवीन भाजिमंडी येथील घटना

अतुल कोल्हे भद्रावती :  शहरातील बाजार वार्ड येथील भाजी मंडी च्या इमारतीच्या आत कुजलेल्या अवस्थेत ट्रॅक्‍टर मजुराचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. दुर्योधन सुधाकर क्षिरसागर वय 36 वर्षे राहणार शिवाजीनगर असे मृतकाचे नाव आहे.

सोमवारला पहाटे दरम्यान नागरिकांना या परिसरात दुर्गंधी येत होती. ती कुठून येत आहे हे बघण्यासाठी गेले असता बंद असलेल्या भाजीमंडी च्या पहिल्या माळ्यावर कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह येथील नागरिकांना आढळला. याची माहिती नागरिकांनी भद्रावती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना तीन ते चार दिवसा अगोदर ची असल्याने हा घातपात तर नाही ना या दिशेने प्राथमिक तपासाकरिता मृतकाची पत्नी हिला विचारणा केली असता तिने सांगितले माझा नवरा ट्रॅक्टर मजूर असून जास्त प्रमाणात मद्य प्राशन करीत होता. दोन ते तीन दिवस घरी येत नव्हता. या माहितीवरून दुर्योधन चा अति मद्यप्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणेदार गोपाल भारती यांनी वर्तविला असुन पुढील तपास सुरू आहे.