” अग्णिपथ ” नकोय ;कंत्राटी पध्दत रद्द करा : सोनेरी ध्येय बहुउद्देशिय संस्थेची मागणी

मूल (प्रतिनिधी) : भारत सरकारने सैन्य भरतीसाठी अग्णिपथ 2022 या योजनेची घोषणा केेली. सदर योजनेत 17 ते 21 वयोगटातील युवकांची अग्णिवीर म्हणुन भरती केली जाणार आहे. ही योजना युवकांच्या दृष्टीने फसवी असल्याने अग्णिपथ मधील सैनिक भरतीतील कंत्राटी पध्दत रद्द करण्याची मागणी सोनेरी ध्येयं बहुउद्देशिय संस्थेने केली आहे. तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. Cancel the contract system for recruitment of soldiers in Agneepath

भारत सरकारच्या अग्णिपथ Agneepath योजने विरोधात देशभर आंदोलन Movement
केले जात आहे. भारतासाठी ही योग्य घटना नाही. यामुळं अग्णिपथ योजनेतील अग्णिविरासबंधी काही बीदूंना घेऊन या योजनेस सहमतीही दर्शविली आहे. यामध्ये अग्निपथ हि सैनिक भरतीतील कंत्राटी पद्धती रद्द करण्यात यावे, 25:अग्निविरांना कोणते निकष अंतर्गत कायम ठेवणार 25 अग्निविरांना सेवा मुक्ती देणार असल्याचे जाहिर करण्यात यावे, 75ःअग्निविरांना सेवामुक्ती नंतर इतर ठिकाणी रोजगार देण्याची नियुक्ती पत्रात लिखित हमी देण्यात यावी, नो रँक , नो पेन्शन No rank, no pension
रद्द करुण कायमस्वरूपी पेन्शन देण्याचे निर्धारित करा व अग्निविरांना स्थायी भविष्य व समाजिक सन्मान देण्याची मागणी सदर निवेदनातुन करण्यात आली आहे.

निवेदन देताना विषमता निमुर्लन दलाचे संयोजक हिरालाल भडके, समता परिषदेचे पुर्व जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, सोनेरी ध्येय बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष रोहित निकुरे यांच्यासह मोठया संख्येने युवक उपस्थित होते.