वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या वारसानांना वनविभागाची आर्थिक मदत

2: कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपयाचे वाटप

मूल (प्रतिनिधी):: वनविभागाच्या बफर क्षेत्रातील मारोडा आणि भादुर्णी येथील दोघांवर वाघानी हल्ला करुन ठार केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती, मृतकाच्या कुटुंबातील कमवता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर उपासमारीचे जीवन जगावे लागत होते, दरम्यान वनविभागच्या बफर क्षेत्राच्या वतीने दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला प्रत्येकी 15  लाख रुपयाचे आर्थिक मदत करण्यात आली. Forest Department provides financial assistance to the families of those killed in the tiger attack

मूल तालुक्यातील मारोडा येथील गजानन आनंदराव गुरनुले याच्यावर 30 एप्रिल रोजी व ला भादुर्णी येथील कुशाल गोविंदा सोनुले यांचावर 15 मे रोजी वाघाने हल्ला करुन  ठार केले हॊते. सदर प्रकरण वनपरीक्षेत्राधिकारी नायगमकर यांनी  मार्गी लाऊन मंजूर करून घेतले. दोन्ही प्रकरणाचे 30 लाख मंजूर झाल्याने प्रत्येकी 15 लाख रुपयाचे धनादेश  वाटप करण्यात आले. 2 Distribution of Rs. 15 lakhs to each family

उर्वरित दोन प्रकरण लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे वणाधिकाऱ्यांनी दे धक्काशी बोलताना सांगितले.

सदरचे धनादेश वाटप करताना मारोडाचे सरपंच भिकारू शेंडे, वनपरीक्षेत्राधिकारी  नायगमकर,  क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक वडे उपस्थित होते.

शेतात जाताना सावधानी बाळगा :  जी आर नायगमकर  Be careful when going to the field: GR Naigamkar

सदर क्षेत्रात सोलर कुंपण व वाघाला पकडण्याचे काम चालू असून लोकांनी शेतात जाताना सावधानी बाळगन्याचे आवाहन  वनपरिक्षेत्र अधिकारी जी आर नायगमकर यांनी केले.