“दिवा” दिसणारं ; महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभुमीवर चंद्रपूरात चर्चा

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मूल (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री ना. एकनाथ शिंदे eknatha shinde यांनी अनेक मंत्री आणि आमदारांना घेवुन सुरत – गुहावाटी गेले आहेत. यामुळं सरकार अस्थिर झाले आहे. भविष्यात एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मदतीनं सत्ता स्थापन करू शकतात,अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे.तसं झालं तर भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांना मंत्रीपद मिळेल,अशी आशा चंद्रपूरकरांना आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या आधी राज्यातील आघाडी सरकार मधील अर्थमंत्री असलेले बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी क्षेत्राचा मोठा विकास केला.मुनगंटीवारांचा नेतृत्वावर जनतेनं विश्वास ठेवला. मूल नगर पालीका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्येही भाजपाची सत्ता आली.आपल्या विधानसभेचा क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मुनगंटीवारांनी नेहमीच प्राधान्य दिलं.मूल तालुक्यात सिंचनाची समस्या असो कि बंधारे, तलाव, दुरूस्ती असो.मुनगंटीवारांनी तात्काळ समस्या सोडविल्या. चिचाळा येथे करोडो रूपयांची पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक वर्षापासुन मौलझरी तलावातील पाणी गळती होत असल्याने नागाळा, गोंडसावरी, महादवाडी, फुलझरी येथील शेतकऱ्याना शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. दरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी मौलझरी तलावाच्या दुरूस्तीसाठी करोडो रूपयाचा निधी मंजुर करून तलावाचे काम पुर्ण करुन घेतले. यामुळं तलावातील लाभधारक शेतकरी आता खरीप पिक घेत आहेत.

एकदा हातात घेतलेल काम पुर्ण झाल्याशिवाय स्वस्त न बसणाऱ्या या नेत्याला मुख्यमंत्री पदाचा “दिवा” मिळावा या अपेक्षेत चंद्रपूर जिल्हयातील जनता आहे.